Home आरोग्य नाशिकमध्ये आणखी १८ पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

नाशिकमध्ये आणखी १८ पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण


नाशिक (वृत्तसंस्था) जिल्ह्यात नव्याने १८ पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यापूर्वी नाशिक आणि मालेगावमध्ये तैनात असलेल्या विविध जिल्ह्यातील तब्बल १०० पोलिसांना कोरोना झाला होता.

 

आज सकाळी कोरोनाच्या ६३ रुग्णांचे चाचणी अहवाल समोर आले. यापैकी ४८ जणांच्या चाचण्या निगेटिव्ह आल्या तर १५ जणांच्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. यामध्ये सर्व पोलीस कर्मचारी आहेत. त्याचबरोबर इतर काही प्रलंबित चाचणी अहवालातून दोन राज्य राखीव पोलीस दलातील (एसआरपीएफ) जवानांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. आतापर्यंत एक हजाराहून अधिक पोलीस महाराष्ट्रात कोरोनाबाधित झाले आहेत. एकट्या मुंबईतच जवळपास ४०० पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे.


Protected Content

Play sound