कोरोना : जिल्ह्यात दिवसभरात ९ बाधित रूग्ण आढळले; ३ रूग्ण कोरोनामुक्त !

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्हा कोवीड रुग्णालयाने आज पाठवलेल्या कोरोना अहवालात दिवसभरात ९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे, तर ३ बाधित रुग्ण कोरोनामुक्त झाले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

 

जळगाव जिल्ह्यात आज आढळून आलेले रुग्ण याप्रमाणे

जळगाव ग्रामीण १, भुसावळ -२, आणि बोदवड ६ असे एकूण ९ बाधित रुग्ण आढळून आले आहे तर ३ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहे. सध्या ३५ रुग्ण विविध कोवीड सेंटरमध्ये उपचार घेत आहे. जिल्हा प्रशासनाने आज पाठवलेल्या कोरोना अहवालात आजपर्यंत १ लाख ४२ हजार ६७० कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून त्यापैकी १ लाख ४० हजार ६० रुग्ण कोरोनामुक्त मुक्त होऊन घरी परतले आहे. तर आज पर्यंत २ हजार ५७५ कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.

नागोराव चव्हाण यांनी आज सायंकाळी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

Protected Content