कोरोना : जिल्ह्यात दिवसभरात केवळ १ संक्रमित रूग्ण आढळला !

जळगाव प्रतिनिधी ।  जिल्ह्यात दिवसभरात कोरोना संक्रमित केवळ १ रुग्ण आढळला असून सुदैवाने एक ही मृत्यू न झाल्याने  दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे. 

 

जळगाव जिल्हा कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरात एक  संक्रमित रूग्ण आढळून आले आहे. तर ९  बाधित रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. यात चोपडा वगळता इतर सर्व तालुके निरंक असल्याचे दिसून आले आहे. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या अहवालात चोपडा  तालुक्यातून १   बाधित रूग्ण आढळून आला आहे. आज दिवसभरात एकुण ९   रूग्ण कोरोना आजारातून बरे होवून घरी परतले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकुण १ लाख ४२ हजार ६०६  बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ३९ हजार ९६२  रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर ६९  बाधित रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

 

Protected Content