महापालिकीने केली अनधिकृत थंड जार उत्पादन प्लांट सील कारवाई

 

जळगाव, प्रतिनिधी । शहरात अनधिकृत थंड पाण्याचे जार उत्पादान करणाऱ्या उत्पादकांवर कारवाईचा बडगा महापालिकेने उगारला आहे. यात योग्य कागदपत्रे सादर करू न शकलेल्या ३५ प्लांटवर सील करण्याची कारवाई करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, जळगाव महापालिकेला राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने २९ ऑक्टोबर २०२० च्या आदेशानुसार ज्या उत्पादकांकडे केंद्रीय भूजल प्राधिकरण व अन्न औषध प्रशासन यांचे ना हरकत प्रमाणपत्र नसेल अशा थंड पाण्याचे जार उत्पादकांवर सील बंद करण्याची कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. या सूचनांच्या अनुषंगाने जळगाव महापालिकेने शहरात सर्वेक्षण केले असता ७५ ते ८० उत्पादक अवैध आढळून आले होते. या उत्पादकांना मनपा आयुक्तांच्या आदेशाने नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. त्यांना सात दिवसाच्या आत दोन्ही कागदपत्रे सादर करण्याचे सूचित करण्यात आले होते. ज्या उत्पादकांनी कागदपत्रे सादर केले नाहीत असे ३५ प्लांट सील करण्याची कारवाई आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्या आदेशानुसार उपायुक्त प्रशांत पाटील यांच्या पथकातील आरोग्य मुख्य आरोग्य निरीक्षक एस. पी. अत्तरदे, एस. बी. बडगुजर, एल. बी. धांडे, यु. आर. इंगळे व अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केली.

Protected Content