कोरोना : जिल्ह्यात आज ५५ रूग्ण बाधित आढळले; ५२ रूग्णांची कोरोनावर मात

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यातून आज ५५ रूग्ण कोरोना बाधित आढळून आले आहे. तर ५२ रूग्णांची कोरोनावर मात केली आहे. आजच भुसावळ तालुक्यातील एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे.

आजची आकडेवारी
जळगाव शहर – ८, जळगाव ग्रामीण-१, भुसावळ-१२, अमळनेर-१, चोपडा-३, पाचोरा-०, भडगाव-१, धरणगाव-४, यावल-०, एरंडोल-१, जामनेर-१, रावेर-१, पारोळा-०, चाळीसगाव-१३, मुक्ताईनगर-८, बोदवड-० तर इतर जिल्ह्यातील १ असे ५५ रूग्ण बाधित आढळले आहे.

आजच्या अहवालानुसार जिल्ह्यात एकुण ५४ हजार ९३० रूग्णांची संख्या झाली आहे. त्यापैकी ५०५ रूग्ण उपचार घेत असून ५२ हजार ९३० रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आज भुसावळ तालुक्यातील एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा कोवीड रूग्णालयाने कळविले आहे.

Protected Content