जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कोवीड रूग्णालयाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालात दिवसभरात एकुण २ बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर ४ बरे होवून घरी परतले आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी कळविले आहे.
जिल्ह्यात आज दिवसभरात जिल्ह्यात दोन बाधित रूग्ण आढळून आले आहे. यात जळगाव शहरात १ आणि जामनेर तालुक्यात १ असे एकुण दोन रूग्ण आहेत. जिल्ह्यात आजपर्यंत एकुण १ लाख ४२ हजार रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार ९४ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर २३ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. जिल्ह्यात आजपर्यंत २ हजार ५७५ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी कळविले आहे.