नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशभरातील इतर राज्यांच्या तुलनेत कोरोना संसर्गामुळे होणारा मृत्यूदर हा गुजरात राज्यात सर्वाधिक आहे. त्यामुळे इतर राज्यांशी तुलना करत ‘गुजरात मॉडल’ फेल गेल्याचे राहुल गांधी यांनी एका ट्वीटमध्ये म्हटले आहे.
गुजरात राज्यातील तुलना काँग्रेस शासित राज्यांशी करत राहुल गांधी यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, कोरोना संक्रमित रुग्णांचा मृत्यूदर गुजरातमध्ये 6.25, महाराष्ट्र 3.73%, राजस्थान 2.32%, पंजाब 2.17%, पुडुचेरी 1.98%, झारखंड 0.5% आणि छत्तीसगढ 0.35% इतका आहे. त्यामुळे या आकडेवारीकडे पाहता कोरोना संकटापुढे ‘गुजरात मॉडेल’ अयशस्वी झाल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. दरम्यान, गुजरातमधील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ही 24,104 वर पोहोचली आहे.