आदित्य ठाकरेंचे पंतप्रधान मोदींना पत्र

मुंबई – राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी अंतिम वर्षाच्या परिक्षांसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींना खुले पत्र लिहिले आहे. या पत्राद्वारे आदित्य ठाकरे यांनी पंतप्रधानांना सर्व परिक्षा, प्रवेश परिक्षा पुढे ढकलण्यात याव्यात अशी विनंती केली आहे.

महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या काळात परिक्षा घ्याव्यात की त्या पुढे ढकलाव्यात असा वाद सुरु झाला आहे. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयातही पोहचले आहे. या संदर्भात आदित्य ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना खुले पत्र लिहिले आहे. या पत्राद्वारे आदित्य ठाकरे यांनी पंतप्रधानांना सर्व परिक्षा, प्रवेश परिक्षा पुढे ढकलण्यात याव्यात अशी विनंती केली आहे.

या पत्राद्वारे आदित्य ठाकरे यांनी अंतिम वर्ष परिक्षा आणि कोरोना काळातील शैक्षणिक वर्ष या संदर्भात आपली मते मांडली. दरम्यान, युजीसीने अनेक विद्यापीठांना अंतिम वर्षाच्या परिक्षा घेण्याचे आदेश दिले आहेत. याचबरोबर जेईई आणि एनईईटी या सारख्या प्रवेश परिक्षांचेही नियोजन केले आहे. या सर्व निर्णयांना सर्वोच्च न्यायालयात आव्हानही देण्यात आले होते. त्यातील जेईई आणि एनईईटी या प्रवेश परिक्षा घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली होती.

Protected Content