कोरोनामुळे सावद्यातील भव्य नागरी सत्काराच्या कार्यक्रमास स्थगिती

सावदा ता; रावेर, प्रतिनिधी । शिवसेना -युवासेना शिवसेनप्रेमी यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि. १४ मार्च रोजी आयोजित महा विकास आघाडीच्या आमदारांचा नागरी सत्कार करण्यात येणार होता, परंतु, हा सत्कार तात्पुरत्या स्वरूपात पुढे ढकलण्यात आला आहे.

उद्या शनिवारी संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास येथील शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या “इंदिरा गांधी” चौकात शिवसेनेची मुलूख मैदान तोप समजले जाणारे जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील तसेच मुक्ताईनगर मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील, चोपडा मतदारसंघ आमदार लताताई सोनवणे , रावेर मतदार संघाचे आमदार शिरिष चौधरी या विभूतीचा भव्य नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजित करण्यात आले होते. मात्र दि १३ रोजी कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानुसार सत्कार तात्पुरत्या स्वरूपात पुढे ढकलण्यात आला आहे. दि. १४ रोजी होणारा जाहीर सत्काराचा कार्यक्रम ह्या तात्पुरता स्वरूपात स्थगित करण्यात आला असल्याचे आयोजक तालुका शिवसेना उपाध्यक्ष श्याम पाटील, शहराध्यक्ष मिलिंद सुरेश पाटील, माजी नागरशेवक लाला चौधरी , युवासेना सरचिटणीस सुरज परदेशी, डिगा महाजन, गौरव भैरवा यांनी एका पत्रकाद्वारे प्रसिद्धीसाठी कळविले आहे.

 

jalgaon corona, jalgaon corona news, jalgaon coronavirus, corona in jalgaon, jalgaon corona cases, covid 19 jalgaon, jalgaon corona update, live trends jalgaon, live trends news jalgaon, jalgaon corona news today,
livetrends jalgaon, covid19 e pass jalgaon, jalgaon latest news

Protected Content