कोरोनाची चाचणी करूनच कैद्यांना तुरूंगात दाखल करावे- अ‍ॅड. देशपांडे यांची मागणी

जळगाव प्रतिनिधी । कोरोनामुळे पॅरोलवर सोडण्यात आलेले कैदी तसेच नवीन कैद्यांना कोरोनाची चाचणी करूनच तुरूंगात दाखल करावे अशी मागणी मनसे नेते अ‍ॅड. जमील देशपांडे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे एका निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.

यासंदर्भात अ‍ॅड. जमील देशपांडे यांनी निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्यातील ६४ तुरुंगामधील १७००० हजार कैद्यांना कोरोना मुळे ४५ दिवसाचा पॅरोल मिळाला होता. त्याची मुदत ७ जुलै२०२० ला संपली आहे. दरम्यान ४५ दिवसाच्या कालावधीत छोट्या मोठ्या गुन्ह्यात या सर्व तुरुंगात परत नवीन कैदी दाखल झाले आहेत. मुळात तुरुंगात आधीपासूनच क्षमतेपेक्षा जास्त कैदी आहेत.कोरोना संसर्गाचा फैलाव रोखण्यासाठी सोशल डीस्टंसिंग आवश्यक आहे.
पॅरोल वर सोडलेले कैदी पुन्हा दाखल झाल्यास तुरुंगात खूप गर्दी वाढेल. त्या मुळे कारागृहात कोरोना वाढीस लागेल.तुरुंग कर्मचारी सुद्धा आतबाहेर येते जात असतात.त्यांना पण कोरोना संसर्ग होण्याचा धोका मोठा आहे. कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे कैद्यांच्या पॅरोल ची मुदत वाढवावी. जेव्हा पण पॅरोल चे कैदी किंवा इतर कच्चे कैदी येतील त्यांच्या कोरोना टेस्ट करूनच कारागृहात पाठवावे अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

Protected Content