यावल, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील कोरपावली विविध कार्यकारी सेवा सह सोसायटी लि.च्या चेअरमनपदी पुनःश्च राकेश वसंत फेगडे यांची तर व्हाईस चेअरमनपदी जयश्री वासुदेव नेहते यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
कोरपावली विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या सर्व नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या नुकत्याच झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजपाचे पदाधिकारी तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलने दणदणीत विजय संपादन केले होते. दि. ४ मार्च रोजी या सर्व नवनिर्वाचित संचालक मंडळाची कोरपावली विकासोच्या सभागृहात पॅनल प्रमुख राकेश फेगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत चेअरमन आणि व्हाईस चेअरमन यांच्या निवडीची सर्व साधारण सभा संपन्न झाली. चेअरमनपदी पुनःश्च विद्यमान चेअरमन राकेश फेगडे यांनी मागील पाच वर्षाच्या काळात केलेल्या शेतकरी आणि सोसायटी हिताच्या निर्णयाच्या पार्श्वभुमीवर पुढील २०२२ ते २०२७ या कार्याकाळासाठी त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. व्हाईस चेअरमनपदी जयश्री वासुदेव नेहते यांची निवड करण्यात आली. या सभेत संचालक जयश्री नेहते , ललीत देविदास महाजन, सुधाकर प्रल्हाद नेहते , यशवंत फेगडे , दत्तात्रय महाजन, इम्रान पटेल , सुलोचना रविन्द्र जावळे , महींद्र दिनकर नेहते, शरद अभिमान पाटील हे सर्व संचालक प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन एम. पी. भारंबे यांनी काम पाहीले तर सोसायटीचे सचिव मुकंदा तायडे आदीनी त्यांना सहकार्य केले.