भुसावळ प्रतिनिधी | ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’निमित्त श्रीमती पी.के.कोटेचा महीला महाविद्यालयात ऑनलाइन कथाकथनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
शुक्रवार, दि .२८ जानेवारी २०२२ रोजी सकाळी १०.०० वाजता ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ निमित्त श्रीमती प. क. कोटेचा महिला महाविद्यालयात कथाकार , प्रा.गोपीचंद धनगर यांचा ऑनलाइन कथाकथनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. उपप्राचार्य प्रा . वाय.डी.देसले यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले.
‘ मराठी भाषा संवर्धन पंधरवडा ‘ निमित्त संपन्न झालेल्या या कार्यक्रमात कथाकार , प्रा . गोपीचंद धनगर यांनी आपल्या ‘निष्ठावंत’ या स्वरचित कथेचं बहारदार सादरीकरण केलं. ग्रामीण बोलीतील संवाद आणि राजकारणातील प्रखर सत्यता मांडणारी निष्ठावंत कथा रसिक त्यांच्या पसंतीस उतरली. विद्यार्थी आणि साहित्य रसिकांचा प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि परिचय मराठी विभाग प्रमुख प्रा. विनोद भालेराव यांनी केले आणि कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सचिन पंडित यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. मनीषा इंगळे यांनी केले.