अल्पवयीनवर सामुहिक अत्याचार; दोघांना बाल सुधारगृहात तर एकाला पोलीस कोठडी

यावल, प्रतिनिधी | तालुक्यात दोन दिवसांपूर्वी एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार झाला होता. याप्रकरणी अटकेतील तिघा आरोपीला आज न्यायालयात हजर केले असता दोघांना बाल सुधारगृहात तर एकाला चार दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.

यावल तालुक्यातील एका गावातील १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोन अल्पवयीन मुलासह एका तरुणाने बळजबरीने आळीपाळीने अत्याचार केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. यासंदर्भात पिडीत मुलीने यावल पोलीसात तिघा आरोपींच्या विरोधात फिर्याद दाखल केली. त्याअनुषंगाने बाललैंगीक अत्याचार व विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. व त्यांना अटक करण्यात आली होती. या घटनेतील दोन आरोपी हे अल्पवयीन असल्याने त्यांना जळगाव येथील बालसुधारगृहात पाठविण्यात आले असुन, यातील तिसरा अटक असलेल्या आरोपी सतिष धनगर (वय२४)यास आज भुसावळ न्यायलयात हजर केले असता न्या .आर .एम. जाधव यांनी त्यास १ फेब्रुवारी २०२२ पर्यंत चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक सुनिता कोळपकर हे करीत आहे.

Protected Content