Home Cities भुसावळ जाडगाव येथे कोरोना प्रतिबंधक लसीकरण कॅम्प

जाडगाव येथे कोरोना प्रतिबंधक लसीकरण कॅम्प

0
117

वरणगाव प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील जाडगाव येथे (दि.27 ऑगस्ट) रोजी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष वाय.आर.पाटील यांच्या माध्यमातून ग्रामपंचायतद्वारे कोरोना प्रतिबंधक लसीकरण कॅम्प घेण्यात आला. 

यावेळी कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्राला जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मा.भैयासाहेब रविंद्र पाटील यांनी भेट दिली. यावेळी सरपंच निखील सुरवाडे यांनी भैय्यासाहेबांचा सत्कार केला. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष वाय.आर.पाटील यांनी उपस्थितांना मास्क व सॅनीटायझर वाटप केले. तसेच लसीकरण केंद्राला लॅपटॉप उपलब्ध करून दिला.

याप्रसंगी उपस्थित तालुकाध्यक्ष दीपक मराठे,  नगरसेवक सुधाकर जावळे, राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्ष तथा जाडगावचे ग्रामपंचायत सदस्य नामदेव पाटील, माजी सरपंच पुंजो पाटील, पोलीस पाटील शिवराम गोसावी, महेश सोनवणे व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. या उपक्रमास जाडगाव ग्राम पंचायतचे सर्व पदाधिकारी ग्रामसेवक मॅडम, कर्मचारी, जिल्हा परिषद, जिल्हा परिषदचे आरोग्य अधिकारी, डॉक्टर्स,जीप मराठी शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक,अंगणवाीतील कर्मचारी, आशा वर्कर्स आणि ग्रामस्थांनी सहकार्य केले.

 


Protected Content

Play sound