जळगाव, प्रतिनिधी | कॉंग्रेसतर्फे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांच्या अध्यक्षतेखाली जळगाव ग्रामीण तालुका दौऱ्याचे आयोजन करण्यात आले. या दौऱ्यात जिल्हाध्यक्ष श्री. पवार यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली.
जळगाव ग्रामीण तालुका दौऱ्याची सुरुवात तालुक्यातील भादली गावातील भागवत सप्ताहची जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांच्याहातून आरती करून झाली. भादली गावात जिल्हाध्यक्ष श्री.पवार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. पुढे कडगाव गावात शेतकऱ्यांसोबत बैठक घेऊन त्या गावातील काही शेतकऱ्यांच्या शेळगाव धरणात जमिनी गेल्या असल्याने अजून त्या शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नाही तरी त्या शेतकऱ्यांना शासन स्तरावर सर्व सर्वतोपरी मदत करून लवकरात लवकर त्यांना मदत मिळावी यासाठी प्रयत्न करणार असे श्री. पवार यांनी सांगितले. नंतर पुढे शेळगाव गावात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. शेळगाव बॅरेज या प्रकल्पाला भेट देऊन बॅरेज कामाचा आढावा घेतला. यावेळी तालुकाध्यक्ष मनोज चौधरी, ज्ञानेश्वर कोळी, रोहित निकम, रवी पाटील, आशुतोष पाटील, भादली येथील उपसरपंच संदीप कोळी, एजाज पटेल, कडगावचे काँग्रेसचे पदाधिकारी मुरली कोळी, शेळगाव येथील सरपंच हरीश कोळी, रूपचंद कोळी, व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.