मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राज्यामध्ये दि. १० ते १२ एप्रिल रोजी हवामानाचा अंदाजानुसार जळगाव जिल्ह्यात ढगाळ वातावरणासह तापमान ४६-४७ पर्यंत जाणार तरी केळी उत्पादक शेतकऱ्यांनी सावधान राहवे असे आवाहन हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी केले. ते उचंदा येथील केळी उत्पादक शेतकरी देवानंद चिंतामण पाटील यांच्या शेत शिवारामध्ये संघवी क्वाॅलिटी प्रोडक्टस् प्रा.लि.व धानुका अॅग्रीटेक प्रा.लि. यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शेतकरी मार्गदर्शन मेळाव्यात आले होते.
शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनपर मेळाव्यात पंजाबराव डख यांनी हवामानाचा अंदाज वर्तवितांंना सांगितले की, राज्यामध्ये ढगाळ हवामान अंदाज जळगाव जिल्ह्याचा तापमान ४६-४७ पर्यंत जाणार तरी केळी उत्पादक शेतकऱ्यांनी सावधान राहण्याचे आवाहन केले. ते पुढे म्हणाले की, १०, ११ व १२ एप्रिलमध्ये ढगाळ वातावरण असणार आहे. ८० टक्के लोक शेती करतात तर पन्नास टक्केही शेती कोरडवाहू आहे. तर २० टक्के लोकांची शेती ३० टक्के लोकांची शेती बागायतदार आहेत. माझ्या शेतीत पन्नास टक्के लोकांच्या शेतीत उडीद, मूग, कपाशी, गहू, हरभरा, बाजरी अशी पिके घेतली जातात. जर पावसाने दहा दिवस उशीर केला तर शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान होते. शेतकरी शेती करणार सोडत नाही आलेल्या संकटाला सामोरे जाण्याची तयारी मात्र बळीराजा ठेवत असतो. कोरोना काळात अनेक कंपन्या बंद पडल्या मात्र माझ्या बळीराजाची शेतकर्यांची कंपनी आणि कधी बंद झाली नाही आणि होणार ही नाही. येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करत राहणार आहे की जेणेकरून कोणत्याही शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान होऊ देणार नाही. मी ३६ जिल्ह्यांमध्ये सातत्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून मेसेज पाठवत आहे. बळीराजा ना होणाऱ्या नुकसानीपासून वाचत असतो.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संघवी क्वालिटी प्रोडक्ट्स प्रा.ली.चे संचालक नयनेश संघवी, सब्जेक्ट मॅटर स्पेशेलिस्ट धानुका अॅग्रीटेक प्रा.लि.चे घनश्याम इंगळे शेतकरी देवानंद पाटील शेतकरी दयाराम पाटील यासह आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी मॅनेजर अंकुश प-हाड , जनरल मॅनेजर दीपक नरवाडकर, यांनी प्रयत्न केले तर या शेतकरी मेळाव्याला उचंदा पंचक्रोशीतील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.