नवी दिल्ली : वृत्तसंस्था | आता केंद्र सरकार रेमडेसिवीर इंजेक्शन्सचा पुरवठा करणार नसल्याने राज्यांना ती थेट कंपन्यांकडून खरेदी करावी लागणार आहेत
दुसरी लाट ओसरत असली तरी दोन महिन्यात वाढती रुग्णसंख्या आणि अपुऱ्या वैद्यकीय उपकरणांमुळे मृतांचा आकडा विक्रम प्रस्थापित करत होता. ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर इंजेक्शनी मागणी वाढली होती. त्यामुळे रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार वाढला होता. पोलिसांनी अनेक ठिकाणी छापेमारी करत रेमडेसिवीर इंजेक्शन जप्त केले होते. त्यामुळे केंद्र सरकार राज्यांना रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा करत होती. मात्र आता केंद्र सरकारने राज्यांना थेट कंपनीकडून इंजेक्शन खरेदी करावे असं स्पष्ट केलं आहे. केंद्रीय रसायन आणि खत राज्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी ही माहिती दिली.
रेमडेसिवीर इंजेक्शनचं उत्पादन दहा पटीने वाढलं होत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळे हे शक्य झालं. ११ एप्रिलरोजी दररोज ३३ हजार इंजेक्शनची निर्मिती होत होती. आता हेच उत्पादन साडे तीन लाखांपर्यंत पोहोचलं आहे”, असं ट्वीट मनसुख मंडाविया यांनी केलं
रेमडेसिवीर इंजेक्शन तयार करणारे कारखाने २० होते. त्यानंतर आता ही संख्या ६० वर पोहोचली आहे. त्यामुळे मागणीपेक्षा जास्त पुरवठा होत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने राज्यांना रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, अंसही त्यांनी सांगितलं. नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग एजेंसी आणि सीडीएससीओला रेमडेसिवीरच्या उपलब्धेवर देखरेख ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
देशातही दुसर्या लाटेचा प्रभाव हळूहळू कमी होत आहे. काल सलग दुसर्या दिवशी देशात दोन लाखांहून कमी रुग्ण आढळले.