जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील कुसुंबा येथील माहेशवाशीनीला मुलबाळ होत नसल्याच्या कारणावरून मारहाण व शिवीगाळ करणाऱ्या दरेगाव येथील पतीसह सासरकडील सहा जणांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसात दिलेल्या फिर्यादीनुसार, अर्चना बाळासाहेब कदम (वय-३२) रा. संभाजी नगर कुसुंबा यांचा विवाह बाळासाहेब निंबा कदम रा. दरेगाव ता. मालेगाव जि.जळगाव यांच्याशी झालेला आहे. लग्न झाल्यानंतर लवकर मुलबाळ होत नाही तसेच पती बाळसाहेब कदम यांना दारूचे व्यसन असल्यामुळे दारू पिऊ नका असे सागितल्याने पत्नी अर्चना यांना शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच विवाहितेचे वडील यांनी देखील समजविण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही शिवीगाळ व जीवेठार मारण्याची धमकी दिली. तसेच सासरे निंबा रंगनाथ कदम, सासू जिजाबाई निंबा कदम, जेठ चंद्रशेखर निंबा कदम, जेठ प्रकाश निंबा कदम, नणंद रेखा राजेद्र काकळीज सर्व रा. दरेगाव ता. मालेगाव जि. नाशिक पतीला छळासाठी प्रोत्साहीत केले. हा छळ विवाहितेला सहन न झाल्याने कुसुंबा ता. जळगाव येथे निघून आल्या. विवाहितेच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.