कुलगाममध्ये चकमक ; दोन दहशतवादी वादी ठार

श्रीनगर (वृत्तसंस्था) जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातील मनगोरी परिसरामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली आहे. या चकमकीदरम्यान दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.

 

कुलगाम परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यामुळे जवानांनी या परिसराला घेराव घालत परिसरात शोधमोहीम सुरू करण्यात आली. यावेळी दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला. त्यामुळे त्यांच्या गोळीबाराला जवानांकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आले. त्यात दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले. परिसरात आणखी काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली असल्याने शोधमोहीम सुरू आहे.

Protected Content