भुसावळ, प्रतिनिधी | हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त तालुक्यातील कुर्हे पानाचे येथील ग्रामपंचायतीत अभिवादन करण्यात आले.
कोरोना नियमांचे पालन करून आज कुर्हे येथील ग्रामपंचायतीत छोटेखानी कार्यक्रमातून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली. यात प्रारंभी बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. , प्रास्ताविक जितेंद्र नागपुरे यांनी केले. मान्यवरांनी आपल्या मनोगतातून त्यांच्या महान कार्याला उजाळा दिला.
आज बाळासाहेब ठाकरे आणि नेताजी सुभाषचंद्र बोस या दोन महान नेत्यांची जयंती असून त्यांच्या जीवनातून आपल्याला ज्वाजल्य देशभक्ती शिकायला मिळाली आहे. दोन्ही नेते जहाल मतवादी होती. त्यांनी आयुष्यात कधीही शब्द फिरविला नाही. एकनिष्ठ, एकवचनी आणि एकाच विचाराला प्रमाण मानणार्या या नेत्यांच्या विचारांवरून चालणे हीच त्यांना खर्या अर्थाने आदरांजली ठरणार असल्याचे प्रतिपादन याप्रसंगी मान्यवरांनी केले. याप्रसंगी सरपंच जनार्दन पाटील, उपसरपंच विलास रंदाळे, ग्रा. प. सदस्य रामलाल बडगुजर, हरिचंद्र बरकले , किशोर कोळी, सावकार पारधी , संजय वराडे, प्रमोद उंबरकर, किशोर पाटील, संदीप महाजन तसेच सामाजिक कार्यकर्ते तथा शिवसेनेचे पदाधिकारी जितेंद्र नागपुरे, दिनेश काकडे, एकनाथ धांडे, ग्रा. प. कर्मचारी राजेंद्र पाटील, संदीप बारी, विकास धांडे, सुनील जैन, इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पिंटू उंबरकर तर आभार सरपंच जनार्दन पाटील यांनी मानले.