परप्रांतीयांना प्रभात चौकांत लोक संघर्ष मोर्चातर्फे मोफत जेवणासह विविध सुविधा

जळगाव, प्रतिनिधी । लोक संघर्ष मोर्चातर्फे प्रभात चौकात जवळपास ८० हजार परप्रांतीय मजुरांना मोफत जेवण, थंड पाणी, चाहा-नाश्ता चप्पल, औषधी, मेडिकल असिस्टन्स पुरविण्यात येत आहे.

लोकसंघर्ष मोर्चाद्वारे आयोजित प्रवासी मजूर अन्नछत्र चालवण्यासाठी लोकसंघर्ष मोर्चा प्रतिभाताई शिंदेंनी पुढाकार घेतल्यावर त्यांना सोबत क्रेडाई, वाजिद फाउंडेशन, महेश भाई चावला, विनोद भाई नाथांनी अशोकभाई मंधान, सुजित भाऊ पाटील, राजेश पाटील, प्रमोद पाटील, योगेश पाटील , जळगाव सर्कल नन्नवरे , चंदनभाऊ चोपडा, कस्ट्राईब संघटना, जळगाव तिन्ही तलाठी, श्रीकांत मोरे, किरण वाघ, फकीरा सपकाळे, तासिम भाई, गौतम सपकाळे, सिद्धार्थ शिरसाट, योगेश, किरण भाऊ भोळे, दामू भारंबे, सुमित साळुंके, अनीलभाऊ सपकाळे, कलिंदर तडवी, विजया नेरकर आदी सर्वांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवून सर्व आपल्या आरोग्याची काळजी घेत प्रवाशांची सेवा करत आहेत. याठिकाणी २० तारखेपर्यंत ट्रकने जाणारे जवळपास दहा ते बारा हजार लोक दररोज आपली भूक भागवत होते. २० तारखेनंतर प्रवाशी मजुरांचे प्रमाण कमी होवून आजपर्यंत रोज चार ते पाच हजार लोक या सुविधेचा लाभ घेत आहेत. झारखंड,पश्चिम बंगाल, उडीसा, उत्तर प्रदेश,छत्तीसगड, मध्प्रदेश बिहार व महाराष्ट्र येथील प्रवासी कष्टकरी लोकांना याचा लाभ घेतला.

Protected Content