पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये महिलांचा सन्मान

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये विविध विभागातील महिला कर्मचाऱ्यांचा जागतिक महिला दिनानिमित्त सन्मान करण्यात आला.

 

या सन्मान सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी पाचोरा पोलिस स्टेशनच्या पोलिस उपनिरीक्षक विजया वसावे ह्या होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राहुल खताळ, मराठा मावळा प्रतिष्ठाणचे अध्यक्ष किशोर बारावकर, कार्याध्यक्ष माधव बोरसे, सचिव अॅड. दिपक पाटील, उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, अॅड. मनिषा पवार, अॅड. ललिता पवार, श्रीकृष्ण हाॅस्पिटलच्या संचालिका डॉ. अनुजा परदेशी, मंदा पाटील, कामिनी पाटील, डॉ. दिलीप पाटील हे होते‌.

 

 

मराठा मावळा प्रतिष्ठाण व पाचोरा पोलिस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने “जागतिक महिला” दिन सप्ताह निमित्त दि. ११ मार्च रोजी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये आशा वर्कर्स, रुग्णालयातील परिचारिका, नगरपालिकेतील महिला सफाई कामगार, पोलिस स्टेशनमधील महिला कर्मचारी यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सन्मान सोहळ्याची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांनी उपस्थित महिला भगिनींना त्यांच्या कर्तृत्वाची व संरक्षणाची जाणीव करुन  देत असतांना महिलांनी आपल्या परिवाराची घ्यावयाची काळजी तसेच आत्मनिर्भर होण्याचा मोलाचा सल्ला दिला. पोलिस उपनिरीक्षक विजया वसावे यांनी उपस्थित महिलांना कायद्याच्या संदर्भात सखोल मार्गदर्शन केले. श्रीकृष्ण हाॅस्पिटलच्या संचालिका डॉ. अनुजा परदेशी यांनी मुलगी व मुलगा यामध्ये भेदभाव न करता महिला ह्या सक्षम असुन त्यांनी माहेरच्यां सोबतच सासरच्यांही आपल्या कर्तृत्वाने नाव लौकिक करावा असा मोलाचा सल्ला उपस्थितांना दिला.

 

सन्मान सोहळ्याचे सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन अॅड. दिपक पाटील यांनी केले. या सन्मान सोहळ्या प्रसंगी पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे, गोपनीय शाखेचे पोलिस काॅन्स्टेबल सुनिल पाटील, नितीन सुर्यवंशी, पोलिस काॅन्स्टेबल दिपक सुरवाडे, भगवान बडगुजर, विश्वास देशमुख, विकास खैरे, योगेश पाटील, गजु काळे उपस्थित होते.

Protected Content