ओबीसी समाजाचे हक्काचे आरक्षण लागु करा; पाचोऱ्यात भाजपाचे निवेदन

पाचोरा प्रतिनिधी । ओबीसी समाजाचे हक्काचे आरक्षण लागू करावी या मागणीसाठी पाचोरा येथे भाजपाच्या वतीने प्रशासनाला मागणीचे निवेदन देण्यात आले.

काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओ. बी. सी. समाजाला असलेले राजकीय आरक्षण, या संदर्भातील महाविकास आघाडी सरकारची पुनर्विचार याचिका फेटाळली. ज्या संदर्भात दि. १२ डिसेंबर – २०१९ रोजी सर्वोच्च न्यायालयाने महाविकास आघाडी सरकारला ओ.बी.सी. आरक्षणा संदर्भाने काही आदेश दिले होते. सर्वोच्च न्यायालयाने बजावून सांगितले होते की, “लवकरात लवकर ‘राज्य मागासवर्गीय आयोगाचे गठन करावे. राज्यातील ओबीसी समाजाचा ‘इप्रेसियल डाटा’ जमा करून तो तात्काळ न्यायालयास सादर करावा.” न्यायालयाच्या या आदेशाला जवळपास पंधरा महिने झाले मात्र अजूनही महाविकास आघाडी सरकारने साधे राज्य मागासवर्गीय आयोगाचे गठन देखील केलेले नाही. ही अत्यंत गंभीर बाब आहे. १२ डिसेंबर नंतर देखील ह्या महाविकास आघाडी सरकारला सर्वोच्च न्यायालयाने जवळपास दहा ते बारा तारखा दिल्या, एकही तारखेला शासन न्यायालयाने दिलेल्या आदेशांची पूर्तता करून न्यायालयात हजर राहिले नाहीत. व महाविकास आघाडी सरकारने या प्रकरणात स्वतः जातीने लक्ष घातले नाही. मात्र महाविकास आघाडी सरकार ओ. बी. सी. समाजाला देखील क्षुल्लक समजत आहे. एवढेच नाही तर ह्या महाविकास आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा वारंवार अवमान केला. याचाच फटका ओ. बी. सी. समाजाला बसला आहे. गेली पंधरा महिने सरकार फक्त कोर्टात जाऊन पुढची तारीख मागत होते. महाविकास आघाडी सरकारच्या ह्या नाकर्तेपणाचा आम्ही जाहीर निषेध करतो. भारतीय जनता पार्टी ओ. बी. सी. मोर्चा आपल्या माध्यमातुन कळवु इच्छीतो की, लवकरात लवकर यावर ठोस कारवाई करावी, तसे झाले नाही तर आमच्याकडे आंदोलना शिवाय दुसरा पर्याय उरणार नाही. लाखोंच्या संख्येने ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ओ. बी‌. सी. समाजाला दिलेले हक्काचे आरक्षण आम्ही मिळवूनच राहू आमच्या ओ.बी.सी. समाजाला त्यांच्या हक्काचे आरक्षण मिळणार नाही, तोवर आम्ही शांत बसणार नाही. अशा आषयाचे निवेदन पाचोरा भाजपा पदाधिकाऱ्यांतर्फे प्रशासनास देण्यात आले. सदरचे निवेदन नायब तहसिलदार संभाजी पाटील यांनी स्विकारले.

याप्रसंगी जिल्हा सरचिटणीस तथा पिंपळगाव – शिंदाड गटाचे जि. प. सदस्य मधुकर काटे, शहर अध्यक्ष रमेश वाणी, गोविंद शेलार, सुनिल पाटील, दिपक माने आदी उपस्थित होते.

Protected Content