सावदा, ता. रावेर प्रतिनिधी । लॉकडाऊनमुळे कुंभार समाजबांधवांना प्रचंड आर्थिक फटका बसला असल्याने या समाजाला यंदा हतनूर धरणातील गाळ विनामूल्य उपलब्ध करून द्यावा अशी मागणी माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे यांनी एका निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.
गेल्या दोन तीन महिन्यापासून कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. शासनाकडून उपाययोजना म्हणुन लाँकडाउन करण्यात आले आहे यात अनेकांची उद्योगधंदे व रोजगार बुडाले आहेत. सावदा शहरातील व परिसरातील कुंभार समाज बांधवांचे जीवनमान हे मातीकामावर अवलंबून असून काम धंदे सद्यस्थितीत बंद असल्यामुळे अनेक कुटुंब हे उघड्यावर आले आहेत. शहरात पारंपारिक रित्या वीट काम, मातीच्या चुली भांडी मूर्ती तयार करून आपली गुजराण करत असतात परंतु शासनाने कोरणा विषाणूच्या नियंत्रणासाठी घातलेल्या लॉकडाऊन मुळे सावदा परिसरासह शहरातील कुंभार समाज बांधवांचा व्यवसाय पूर्णपणे डबघाईस आला आहे. याचा विचार करता या समाजाला दिलासा मिळावी म्हणून त्यांना जवळच असलेल्या आतनूर धरणातून विनामूल्य गाळ वाहतुकीस परवानगी द्यावी अशा आशयाचे निवेदन सावदा शहराचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक राजेश वानखेडे यांनी तहसीलदार यांना दिले आहे. यावेळी पत्रकार शाम पाटील, पितांबर कुंभार, बाळू कुंभार आदी उपस्थित होते.