यावल प्रतिनिधी । तालुक्यातील किनगाव बुद्रुक येथे महात्मा ज्योतीबा फुले वाचनालयाचे उद्घाटन यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्याहस्ते करण्यात आले.
यावेळी पोलीस निरिक्षक सुधीर पाटील व सावदा पोलीस स्टेशनचे पोउनि देविदास इंगोले यांनी आपले मनोगत व्यक्त केले. हिंदवी स्वराज्य सेनेच्या वतीने यांनी हे वाचनालय सुरू केले आहे. गावातील श्रीराम चौक, चौधरीवाडा जवळ हे वाचनालय सुरू करण्यात आले. या वाचनालयाची कार्यकारीणीची माहीती ही मान्यवरांना देण्यात आली. या कार्यक्रमाला वाचनालयाचे अध्यक्ष राहुल पाटील, अनिस पिंजारी, उपाध्यक्ष मोहन पाटील, सचिव समाधान महाजन, सहसचिव दिपक सावांदे, खजिनदार रहिम तडवी, मार्गदर्शक गोपाळ धनगर, ग्रंथपाल सद्दाम खाटीक, रक्षक रोशन साळुंके, सदस्य गौरव कोळी, सदस्य कामेश सोनार, सदस्य मुकेश पाटील, सदस्य सागर पाटील, सदस्य रविंद्र जाधव, सदस्य पंकज धनगर, सदस्य उदय चौधरी, श्रीराम मंदिर संस्थानचे चेअरमन करमचंद पाटील, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष कडू आप्पा, संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष विजय पाटील, बाँक्सरपटू दिशा पाटील, संदीप पाटील, गोपाळ पाटील, दुर्गादास चौधरी, इमरान तडवी, राजु पिंजारी, चुडामण चौधरी, युवराज चौधरी, भुषण महाजन, शरद पाटील, योगेश धनगर, प्रल्हाद जाधव आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक सेवानिवृत्त शिक्षक डी.एस.खैरनार यांनी केले.