जळगावात नागरीकत्व कायद्याच्या निषेधार्थ बुधवारी रेल रोको आंदोलन

no caa crp

जळगाव प्रतिनिधी । नागरीकत्व कायदा हा हिंदू व मुस्लिम विरोधी असल्याने यांच्या निषेधार्थ बुधवार 25 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता रेल रोको, जिल्हा बंद आणि महामोर्चा होणार आहे. या जनआंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन पीआरपीचे जिल्हाध्यक्ष जगन सोनवणे यांनी कळविले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेच्या माध्यमातून प्रत्येकाला आरक्षण दिले आहे. मात्र भारतीय जनता पार्टी आणि आरएसएस यांनी ही घटना संपविण्याचा डाव रचला आहे. नागरीकत्व कायदा हा मुस्लिमच नाही तर हिंदूच्या विरोधात आहे. या नागरीकत्व कायदा लागू करू नये यासाठी जनग सोनवणे यांच्यासह कार्यकर्ते बुधवार 25 डिसेंबर रोजी जळगावात दुपारी 12 वाजता रेल रोको, जिल्हा बंद आणि महामोर्चा असे आंदोलन करण्यात येणार आहे. दुपारी रेल रोको झाल्यानंतर रेल्वे स्थानकापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत महामोर्चा काढण्यात येणार आहे. जनतेने व आरक्षणवादी, मुस्लिम, संविधानवादी आणि लोकशाहीवादी आणि नागरीकत्व कायद्याविरोधात असलेले जनतेने जनांदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन जनग सोनवणे यांनी केले आहे.

Protected Content