डोक्यात रॉड ते गोळीबार व चॉपर हल्ला : ‘खून का बदला खून !’

जळगाव जितेंद्र कोतवाल | आज नशिराबाद येथील झालेल्या गोळीबार व चॉपर हल्ल्यातील तरूणाच्या खूनातून सुडाचे एक चक्र पूर्ण झाले आहे. सुमारे अकरा महिन्यांपूर्वी भुसावळमध्ये डोक्यात रॉड टाकून झालेल्या हत्येतील खुनाचा बदला आज गोळीबार व चॉपर हल्ल्यातून घेण्यात आला. जाणून घ्या या प्रकरणाची अचूक आणि इत्यंभूत माहिती…!

भुसावळातील गुन्हेगारी विश्‍वात सूडचक्र हे काही नवीन नाही. याचाच एक अध्याय आज नशिराबाद येथील खून प्रकरणातून दिसून आला आहे. याचे बिजारोपण भुसावळ शहरातील पंचशील नगरात ११ ऑक्टोबर २०२० रोजी रात्री झालेल्या एका भयंकर घटनेत होते. पंचशीलनगरातील मदिना मशिदीजवळील रहिवासी मोहम्मद कैफ शेख जाकीर (वय २७) हा आपल्या आई-वडील आणि भावसह रात्री जेवण करून घरासमोर बसला होता. या वेळी पाच जणांनी मोहम्मद कैफ यास शिवीगाळ करीत चपटा-बुक्क्यांनी मारहाण केली. www.livetrends.news तसेच लोखंडी रॉडने मोहम्मद कैफ याच्या डोक्यात जोरदार प्रहार केला. यात गंभीर दुखापत होऊन मोहम्मद याचा मृत्यू झाला होता.

या खूनाला फेब्रुवारी २०२० मध्ये झालेल्या वादाची किनार होती. मोहंमद आणि धम्मप्रिय यांच्यात तेव्हा वाद झाल्याने बाजारपेठ पोलिसात धम्मप्रियवर गुन्हा नोंदविण्यात आला होता. या वादातूनच मोहंमदची हत्या झाल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. तर मोहंमदच्या अंत्यसंस्काराप्रसंगी त्याचा भाऊ समीर याने आपण हत्येचा बदला घेणार असल्याची जाहीर प्रतिज्ञा केली होती.

या प्रकरणी धम्मप्रिया उर्फ धम्मा मनोहर सुरळकर, समीर उर्फ कल्लू अजय बांगर, अश्‍वीन उर्फ गोलू अजय बांगर आणि शुभम पंडित खंडेराव आदींवर गुन्हा दाखल झाला होता. www.livetrends.newsयातील धम्मप्रिया सुरळकर याला अलीकडेच जामीन मिळाला होता. आज त्याच्या वडिलांनी जळगाव येथे जाऊन आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता केली. यानंतर कारागृहातून मुक्त झालेला धम्माप्रिया हा आपल्या वडिलांसोबत घरी जाण्यासाठी निघाला. मात्र तो घरी पोहचण्याआधीच प्राणघातक हल्ल्यात त्याला जीव गमवावा लागला.

दरम्यान, गेल्या वर्षी खून झालेला मोहंमद कैफ शेख जाकीर आणि www.livetrends.news आज मृत झालेला धम्माप्रिया हे दोन्ही तसे गरीब सर्वसाधारण कुटुंबातील. यातील मोहम्मद कैफ हा रस्त्यावर कापड विक्रीसह हमाली करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. त्याचा भाऊ शेख समीर शेख जाकीर हा रेल्वेस्थानकावर पाणी बॉटल, वडा, समोसा व चहा विक्री करतो. तर वडील हातमजुरी करतात. तर सुरळकर कुटुंब देखील सर्वसाधारण स्थितीतले आहे. मात्र वैमनस्यामुळे दोन्ही तरूणांना प्राण गमवावे लागले आहेत. खून का बदला खून या भावनेतूनच आजचे कृत्य झाले असून याचे बिजारोपण हे ११ ऑक्टोबरला झाल्याचे आता स्पष्ट झालेले आहे.

Protected Content