यावल : प्रतिनिधी । तालुक्यातील किनगाव गावाजवळ अवैध गौण खनिज वाहतुक करणाऱ्या डंपर व एका कारद्वारे कारवाई करणाऱ्या महसुल पथकास जिवे ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली आहे
तालुक्यात महसुल पथकावर हल्ला करण्याची ही दुसरी घटना असुन , या घटनेमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे . पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
२८ फेब्रुवारीरोजी रात्री ९ , ४० वाजेच्या सुमारास किनगाव येथे कार्यरत असलेले मंडळ अधिकारी सचिन जगताप, किनगावचे तलाठी टेमरसिंग बारेला , विलास नागरे , राजु घोरटे, गणेश वऱ्हाडे , विजय साळवे , निखील मिसाळ यांचे पथक तहसीलदार महेश पवार यांच्या आदेशान्वये कर्तव्य बजावत होते त्यांनी जळगावहुन किनगावच्या दिशेने येणारे डंपर ( क्र एम एच १२ एफ झेड ८४२५ ) या वाहनास चौकशीकामी थांबविण्याचे प्रयत्न केले असता चालकाने वाहन न थांबवा सरळ वाहन हे किनगाव गावात नेले त्यांचा पाठलाग केला असता डंपर गावातील मशिदीजवळ गर्दीच्या ठिकाणी थांबलेले दिसले डंपर चालकास त्याचे नांव विचारले असता त्यांने आपले नाव गपेश कोळी ( रा . कोळन्हावी ) असे सांगीतले , याच वेळी त्या ठीकाणी टाटा इंडीका कार ( क्र एमएच १९ एपी ४१२८ ) आली गोपाळ सोळुंखे, संदीप सोळुंखे , छगन कोळी व गोपाळ कोळी हे त्या कारमध्ये होते गोपाळ कोळी हा गाडीतुन उतरल्यावर त्यांने मंडळ अधिकारी सचिन जगताप यांच्याशी हुज्जत घातुन तुम्हाला डंपर पकडण्याचा अधिकार नाही असे बोलुन वाद घातला व शासकीय कामात अडथळा निर्माण करून मंडळ अधिकारी यांना छातीवर बुक्का मारला नंतर गावातील मंडळीची वाढती संख्या पाहुन कार घेवुन त्यांनी पळ काढला
त्यानंतर पंचनामा करून डंपर यावलकडे आणत असतांना पुन्हा डंपर चालकाने वाहन साकळी जवळच्या भोनक नदीच्या दिशेने पळविण्याचा प्रयत्न केला कारचालक गोपाळ सोळुंखे यांने महसुल पथक हे कारवाई करीत असतांना कार त्या पथकाच्या दिशेने वेगाने आणुन अधिकारी यांनी जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला . या बाबत यावल पोलीसात संशयीत आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला डंपर व कार जप्त करण्यात आले आहे . पुढील तपास पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस उपनिरिक्षक अजमल पठाण व पोलीस उपनिरिक्षक विनोद खांडबहाले हे करीत आहे