किनगाव एसबीआयच्या शाखा व्यवस्थापकाचा मनमानी कारभार !

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील किनगाव येथील एसबीआय बँकेच्या शाखेतील व्यवस्थापकाचा मनमानी कारभार बँकेच्या कार्यपद्धतीबद्दल ग्राहकांमध्ये नाराजी दिसून येत आहे. ग्राहक सेवा केंद्र देणाऱ्या इच्छुक तरूणाला उडवाउडविची उत्तरे दिली जात आहे.

याबाबतची माहिती अशी की, यावल तालुक्यातील चुंचाळे येथील एका तरूणाने SBI ग्राहक सेवा केंद्रासाठी खाजगी कंपनीकडे अर्ज केला होता. सदर ग्राहक सेवा केन्द्राच्या अर्जावर भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा किनगाव येथील बँक व्यवस्थापक यांच्या स्वाक्षरीची आवश्यकता होती. व्यवस्थापक यांनी सही केली नाही. कारण तरूणाने शाखेच्या संदर्भात प्रधानमंत्री कार्यालयात तक्रार दिली होती. व्यवस्थापक यांनी प्रधानमंत्री कार्यालयात तक्रार दिल्याचे सांगू सही करण्यास नकार दिला. त्यानुसार वरिष्ठांनी सही करण्यास मनाई केली असल्याचे सांगितले.

यापुर्वी या तरूणाची एका खासगी कंपनीने एसबीआय ग्राहक सेवा केंद्राच्या नावाखाली फसवणूक केली होती. याबाबत राष्ट्रपती सचिवालयाकडे ऑनलाईन आपले सरकारच्या माध्यमातून तक्रार केली होती. ही तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आली. दरम्यान, जिल्हाधिकारी यांनी एसबीआयच्या मुख्य शाखेकडे तक्रार वर्ग करून चौकशी व कारवाईच्या सुचना देण्यात आल्या होत्या. परंतू यावर देखील दुर्लक्ष झाले. त्यानंत पुन्हा बँकेच्या मुख्य शाखा प्रबंधक यांना ईमेलद्वारे पत्रव्यवहार करण्यात आला व तरूणाला सहकार्य करण्याचे सुचना देण्यात आले होते. शाखा प्रबंधक यांच्याकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने प्रधानमंत्री कार्यालयात तक्रार करण्यात आली. त्यामुळे दिपक नेवे यांना ग्राहक सेवा केंद्र देण्यास किनगाव येथील शाखा एसबीआयचे बँक व्यवस्थापक मंजूरीसाठी सही करण्यास टाळाटाळ करत आहे.

दिपक नेवे यांनी जिल्हा प्रशासन व राष्ट्रीय मानवाधिकार एवं अपराध नियंत्रण ब्युरोचे जिल्हा उपाध्यक्ष याच्याकडे अशी मागणी केली आहे. यात किनगाव येथील बँक मॅनेजर यांची चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी व न्याय मिळून द्यावा, अशी मागणी केली आहे. दरम्यान आपल्याला न्याय न मिळाल्यास बँक शाखा व्यवस्थापकाच्या विरोधात, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग नई दिल्ली यांच्याकडे तक्रार दाखल करण्याचा इशारा नेवे यांनी दिला आहे.

Protected Content