कासोदा येथे बालिका सप्ताहाचे उदघाटन

kasoda news 1

कासोदा, प्रतिनिधी | येथील ग्रामपंचायतीच्या हॉलमध्ये दि.२४ जानेवारी या राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त आज (दि.२२) बालिका सप्ताहाचे थाटात उदघाटन करण्यात आले.

सविस्तर असे की, महिला व बाल विकास मंत्रालय भारत सरकार यांच्या आदेशांन्वये जळगांव जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्या नेतृत्वाखाली ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या अभियानाची अंमलबजावणी करण्यात आली असून कृतीदलाची स्थापना करून, जिल्ह्यात २० जानेवारी ते २६ जानेवारीपर्यंत बालिका सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

येथील कार्यक्रमात एरंडोल येथील बालविकास प्रकल्प अधिकारी शैलजा पाटील, कासोदा क्षेत्र प्रमुख सौ.सपकाळे व अंगणवाडी सेविका कविता वारे, लताबाई ठाकरे , आशा सेविका अनिता पटाईत, रंजना पाटील, गावातील महिला, लहान मोठ्या बालिका, सरपंच ग्रा.पं. सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. यावेळी उपस्थित बालिकांचे औक्षण करण्यात आले.

Protected Content