महाराष्ट्र-गोवा बार कौन्सील अध्यक्ष अॅड.भिडे यांची भुसावळ वकील संघाला भेट

bhusaval bar

भुसावळ, प्रतिनिधी | नाशिक येथे दि.१५ व १६ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय वकील परिषदचा प्रसार व प्रचार करण्यासाठी महाराष्ट्र-गोवा बार कौन्सीलचे अध्यक्ष अॅड.अविनाश भिडे यांनी आज (दि.२२) येथील वकील संघाला भेट दिली.याप्रसंगी भुसावळ वकील संघाचे अध्यक्ष अँड. तुषार पाटील, सचिव अॅड. रम्मु पटेल यांनी त्यांचा वकील संघातर्फे शाल श्रीफळ, बुके देवुन सत्कार केला.

 

याप्रसंगी बोलताना अॅड.भिडे म्हणाले की, वकीलांसाठी येणारा काळ हा सुवर्णकाळ असेल. वकीलांनी मॉडर्न प्रॅक्टीसचा अवलंब करावा, त्यामुळे वकीलांना निश्चित फायदा होईल. त्यासाठी बार कौन्सीलतर्फे कोचिंग क्लासेस घेण्याची सुविधा आम्ही उपलब्ध करून दिली आहे. यावेळी वकील संघातर्फे त्यांना विविध मागण्यांचे निवेदनही देण्यात आले.

याप्रसंगी बारचे उपाध्यक्ष अॅड.धनराज मगर, सहसचिव अॅड.पुरुषोत्तम पाटील, महिला प्रतिनिधी अॅड.जास्वंदी भंडारी, ॲड.विजय तायडे, अॅड.अशोक शिरसाठ, नरेंद्र महाजन, अॅड.नितीन रजाने, अॅड.वैशाली चौधरी, ग्रंथपाल संजय तेलगोटे, ॲड.शाम गोंदेकर, अॅड.महेशदत्त तिवारी, आदी उपस्थितीत होते. महाराष्ट्र-गोवा बार कौन्सीलतर्फे लवकरच जिल्हा स्तरावर जिल्हा फेडरेशन समिती स्थापन करण्यात येणार असून त्याद्वारे वकीलांच्या समस्या सोडवण्यात येणार आहेत. त्यामध्ये संघाचे अध्यक्ष व बार कौन्सीलचे सदस्य हे सभासद राहतील.

Protected Content