काश्मीरमध्ये लष्कराच्या जवानांवर दहशतवाद्यांचा गोळीबार

 

 

श्रीनगर : वृत्तसंस्था । जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगरजवळील एचएमटी भागात तीन दहशतवाद्यांनी अचानक लष्कराच्या जवानांवर हल्ला चढवला. या हल्ल्यात आपले दोन जवान गंभीर जखमी झाले, उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. जम्मू-काश्मीरच्या पोलीस महानिरिक्षकांनी ही माहिती दिली.

पोलीस महानिरिक्षक म्हणाले, “तीन दहशतवाद्यांनी आपल्या लष्कराच्या जवानांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. यामध्ये दोन जवान गंभीर जखमी झाले, त्यानंतर त्यांचे निधन झाले. जैश-ए-महंम्मद या दहशतवादी संघटनेचा या हल्ल्यामागे हात असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण ही संघटना या भागात अॅक्टिव्ह आहे.

हल्ल्यानंतर दहशतवादी एका कारमधून घटनास्थळावरुन फरार झाले, त्यांच्याजवळ हत्यारं होती. यांपैकी दोघे जण पाकिस्तानी तर एक जण स्थानिक दहशतवादी असावा अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. संध्याकाळपर्यंत आम्ही या हल्ल्यामागे नेमका कोणाचा हात होता, त्यांची ओळख पटवू, असेही पोलीस महानिरिक्षकांनी सांगितलं.

Protected Content