जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य प.वि.पाटील विद्यालय येथे विद्यार्थ्यांची पतंग बनवण्याची कार्यशाळा उत्साहात पार पाडण्यात आली.
विविध प्रकारचे सजावटीचे साहित्य वापरून विद्यार्थ्यांनी या वेळी आकर्षक पतंग तयार केले. त्या पतंगांवर विविध प्रकारचे समाज जागृतीचे संदेश देखील लिहिण्यात आले तर काही विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या कार्टून्स ने ते सजवले. पतंग उडवताना आम्ही मांजाचा वापर करणार नाही, ही शपथ या वेळी विद्यार्थ्यांनी ग्रहण केली.
मकर संक्रात म्हणजे एकमेकांशी असलेले आपले नाते अधिक गोड करण्याचा दिवस म्हणून तो साजरा करताना कुणालाही इजा होणार नाही याची दक्षता पतंग उडवताना आम्ही घेऊ अशा पद्धतीत विद्यार्थ्यांनी आपला मानस व्यक्त केला. कार्यशाळेचे आयोजन उपशिक्षिका स्वाती पाटील कायनात सैय्यद तसेच उपशिक्षक अशोक चौधरी यांनी मुख्याध्यापिका रेखा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केले तर उपशिक्षक योगेश भालेराव , सुधीर वाणी यांनी विशेष सहकार्य केले.