सावदा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | चिनावल येथील गणेश विसर्जन मिरवणूक उत्साहात व आनंदात पार पाडा. कायदा व सुरक्षेचे भान राखून बाप्पाला निरोप द्या असे आवाहन जिल्हा अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी केले.
उद्या म्हणजेच मंगळवार दि. ६ रोजी चिनावल येथील श्री गणेशाचे ७ व्या दिवशी विसर्जन होत आहे या पार्श्वभूमीवर आज शांतता कमिटी व श्री गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या २ वर्षापासून कोरोनामुळे गणेशोत्सव साध्या पद्धतीने पार पडला. यंदा निर्बंध मुक्त वातावरणात गणेश विसर्जन मिरवणूक पार पडणार आहे. मात्र, यात कोणत्याही प्रकारचा व्यत्यय न येता कायदा सुव्यवस्थेला बाधा न पोहोचवता मिरवणूक पार पाडण्याचे आवाहन अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी केले. या बैठकीला फैजपूर विभागाचे उप विभागीय पोलिस अधिकारी डॉ. कृणाल सोनवणे , सावदा पोलीस स्टेशनचे सपोनि देविदास इंगोले यांनी या बैठकीत गणेश मंडळाचे पदाधिकारी व गावातील शांतता समिती सदस्यांच्या बैठकीत केले. यावेळी उद्याच्या विसर्जन मिरवणूकीसाठी गणेश मंडळांना नंबर देण्यात आले. यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष योगेश बोरोले , पोलिस पाटील निलेश नेमाडे, उपसरपंच परेश महाजन, शि. प्र. मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत सरोदे, कृउबा सभापती गोपाळ नेमाडे, दामोदर महाजन, किशोर बोरोले, सागर भारंबे , संदिप महाजन , प्रेमचंद भारंबे, दिनेश महाजन, गोटू नेमाडे, विहिंपचे योगेश भंगाळे हे प्रमुख उपस्थित होते
गावातील १६ गणेश मंडळाचे पदाधिकारी, गावस्तरीय पदाधिकारी उपस्थित होते. सावदा पोलीस स्टेशन चे उप निरीक्षक समाधान गायकवाड , जावळे , यशवंत डहाके , देवेंद्र पाटील ,विनोद पाटील व कर्मचारी हजर होते सदर वेळी बैठकीचे सूत्रसंचालन अनिल किरंगे सर यांनी तर आभार दिलिप भारंबे यांनी मानले.