अमळनेर, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील कळमसरे येथील डी. डी. राजपूत सर यांचा शालेय जीवनातील त्यांच्या प्रदीर्घ सेवेला आज भावनिक पूर्णविराम मिळाला. त्यांचा सेवापूर्ती निरोप समारंभ नुकताच संपन्न झाला.
कळमसरे विद्या प्रसारक संस्थेने चालवलेल्या शारदा माध्यमिक शाळेत ते पी. टी. अर्थात क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांनी अगदी सुरुवातीपासून प्रामाणिक ज्ञानार्जन व विद्यार्थी घडविण्यासाठी प्रामुख्याने स्वतःला झोकून दिले होते. त्यामुळेच मैदानी खेळात अनेक विद्यार्थी तयार करून तालुका,जिल्हा व राज्यस्तरीय खुल्या मैदानी स्पर्धेत गावाचे तसेच शाळेचे नाव नेहमी अग्रस्थानी ठेवले. याच त्यांचा कामाची पावती म्हणून त्यांना अनेक क्रिडा पुरस्कार देखील मिळाले आहेत. क्रीडा शिक्षक डी. डी. राजपूत सर कळमसरे शिक्षण संस्था मधुन पूर्ण वेळ सेवा देऊन आज सेवानिवृत्त झाले. त्यांना कळमसरे संस्थेतील पदाधिकारी शिक्षक तसेच या शाळेतील आजी माजी विद्यार्थ्यांनी भावनिक निरोप दिला. त्यांना निरोप देताना अनेकांनी आपल्या अश्रूना वाट मोकळी करून दिली. तसेच पुढील जीवन प्रवास गोड आनंददायी जावो अशा शुभेच्छा दिल्यात.