के.के. इंटरनॅशनल स्कूलतर्फे गुरूपौर्णिमा व इंन्वेस्टीचर सेरेमनी कार्यक्रम उत्साहात

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । के.के. इंटरनॅशनल स्कूलमध्ये गुरूपौर्णिमा व इंन्वेस्टीचर सेरेमनी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

 

जाणता राजा प्रतिष्ठान संचलित केके इंटरनॅशनल स्कूल मध्ये इन्वेस्टीचर सेरेमनी  व गुरुपौर्णिमा कार्यक्रम अतिशय जल्लोष पूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे संचालक मनोज पाटील व सीमा पाटील यांच्यासह शाळेच्या उपमुख्याध्यापिका मनीषा धबाडे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

 

कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले. यानंतर कार्यक्रमाची रूपरेषा सांगण्यात आली. त्यानंतर शाळेचे ४ हाऊसमध्ये विभाजन केले होते. यात सुभाषचंद्र बोस हाऊस, संत तेरेसा हाऊस, चंद्रशेखर आझाद हाऊस व राणी लक्ष्मीबाई हाऊस या हाऊस मधील शिक्षक तसेच हाऊस कप्तान यांना व्यासपीठावर बोलवून त्यांना ब्याजेस व स्याचेस देण्यात आले. त्यानंतर प्रत्येक हाऊसची प्रतिज्ञा घेण्यात आली. विद्यार्थ्यांचा मार्च पास्ट परेड अतिशय सुंदररित्या पार पडला.

 

सर्व हाऊसच्या विद्यार्थ्यांनी  सामूहिक नृत्य सादर केले. शाळेच्या शिक्षिका सौ. दिपाली चौधरी मॅडम यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. आभार प्रदर्शन विशाल इंगळे सरांनी व्यक्त केले. सर्व शिक्षकांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळाले. सर्वांच्या उपस्थितीत कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला

Protected Content