धरणगाव प्रतिनिधी । कृषी दिनानिमित्त तालुक्यातील कल्याणेहोळ येथील कृषी महाविद्यालयात प्रशिक्षणार्थी कृषी कन्या यांच्यामार्फत वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी कृषी कन्या लेखा पाटील यांनी वृक्षारोपण व संवर्धनाचे महत्त्व शेतकऱ्यांना पटवून दिले.
लॉकडाऊनचे नियमांचे पालन करीत, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत, मास्कचा वापर करून कल्याणेहोळ येथे हरितक्रांतीचे व रोजगार हमीचे जनक, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांची जयंतीनिमित्त कृषी दिन साजरा करण्यात आला. कृषी दिनाच्या निमित्ताने लेखा पाटील यांनी शेतकऱ्यांना ३० विविध प्रकारची रोपे दिली. यावेळी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण करणे गरजेचे आहे. वृक्ष लागवड करताना वड, पिंपळ, औदुंबर, असे ऑक्सीजनचा मोठ्या प्रमाणात पुरवठा करणारी झाडे लावावीत. मर्यादित झाडे लावा मात्र जेव्हढी झाडे लावलेली असतील तेवढी वाढवली पाहिजे आणि संवर्धन केले पाहिजेत.
धुळे येथील कृषी महाविद्यालयचे प्रशिक्षणार्थी कृषी कन्या म्हणून लेखा पाटील ह्या कल्याण होल येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. यासाठी कृषी महाविद्यालयाचे प्रा.ए.बी. गायकवाड, प्रा.एस.डी. पाटील मार्गदर्शन करीत आहेत. वृक्षारोपणाचा या कार्यक्रमाला कल्याणे होळचे सरपंच रमेश पाटील, पोलिस पाटील उखर्डू पाटील, धरामसिंग पाटील, मृगेंद्रसिन्ह पाटील, ईश्वर पाटील, नवदिपसिंह पाटील, जंगल पाटील, बापू पाटील, गौतम शिरसाठ आदी उपस्थित होते.