Home आरोग्य मागील २४ तासांत राज्यात आणखी ७७ पोलीस कोरोना पॉझिटिव्ह

मागील २४ तासांत राज्यात आणखी ७७ पोलीस कोरोना पॉझिटिव्ह

0
42


मुंबई (वृत्तसंस्था) मागील २४ तासांत राज्यात आणखी ७७ पोलीस कोरोना पॉझिटिव्ह आढळून अलुमुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान, एका पोलीस कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

 

राज्यात आजरोजी कोरोनाचा उपाचार सुरू असलेल्या पोलिसांची एकूण संख्या १ हजार १५ वर पोहचली आहे. तर आतापर्यंत करोनामुळे ६० पोलिसांना जीव गमावावा लागला आहे. मागील २४ तासांत तब्बल १८ हजार ६५३ नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून, ५०७ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. याचबरोबर देशातील एकूण करोनाबाधितांची संख्या ५ लाख ८५ हजार ४९३ वर पोहचली आहे. दरम्यान, नागरिकांनी घरात सुरक्षित रहावे यासाठी, आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोना महामारीच्या संकट काळात सेवा बजावणाऱ्या कोरोना योद्धा पोलीस मोठ्या प्रमाणात संक्रमित होत असल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.


Protected Content

Play sound