कलाग्राम येथे पुस्तक भिशी तर्फे कुसुमाग्रजांच्या कवितांचे अभिवाचन

नशिराबाद, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त भारतरत्न डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशी तर्फे कलाग्राम यांच्या संयुक्त विद्यमाने ललित कला केंद्र प्राचार्य राजेंद्र महाजन यांच्या अध्यक्षतेखाली कुसुमाग्रजांच्या जीवन मूल्यात्मक कवितांचे अभिवाचन करण्यात आले.

 

प्रारंभी प्रतिमापूजनाच्या परंपरेऐवजी कुसुमाग्रजांच्या साहित्यकृतींचे प्रतिभापूजन अध्यक्षांच्या हस्ते पुष्पमाला अर्पण करून करण्यात आले. किशोर पाटील (भुसावळ ) यांनी ‘ यौवन ‘ तर डी. के.पाटील यांनी ‘ अनामवीर ‘ कविता सादर केली. चित्रकार हरुण पटेल यांनी ‘ प्रेम म्हणजे ‘ , विजय लुल्हे यांनी ‘ एकांताचं शिल्प ‘ स्वलिखित कविता सादर केली. तसेच श्री. लुल्हे यांनी कुसुमाग्रजांची ‘ कणा ‘ कविता सादर केली.
दरम्यान, भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम पुस्तक भिशी, जळगाव जिल्हा प्रमुख विजय लुल्हे यांनी निवृत्त प्रा. अंजली गवळी यांच्या हस्ते कलाभ्यासासाठी संदर्भग्रंथाचे ग्रंथदान कलाग्राम संकल्पित ग्रंथालयासाठी संस्थापक, संचालक चित्रकार श्याम कुमावत यांना ललित कला केंद्र चोपडा प्राचार्य राजेंद्र महाजन, शिल्पकार निरंजन शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत सुपूर्द केले. अध्यक्षीय मार्गदर्शन करताना प्राचार्य राजेंद्र महाजन यांनी कुसुमाग्रजांच्या चतुरस्र अभिजात लेखन प्रवास सांगून ‘ प्रेम म्हणजे ‘ कविता मधील आशयसूत्र उलगडून दाखविले.निसर्गकन्या बहिणाबाई चौधरी यांची ‘ अरे संसार संसार ‘ ही कविता संतोष साळवे यांनी सुरेल गाऊन रसिकांची दाद मिळवत कार्यक्रमाचा कलात्म समारोप केला. सूत्रसंचालन विजय लुल्हे यांनी केले. आभार हेमंत सावकारे यांनी मानले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी प्रेरणा व मार्गदर्शन पत्रकार शेखर पाटील, निवृत्त शिक्षण उपसंचालक ( प्राथमिक विभाग ) तथा साहित्यिक शशिकांत हिंगोणेकर, निवृत्त डायट प्राचार्य निळकंठ गायकवाड ,माध्यमिक उपशिक्षणाधिकारी सिद्धार्थ, चित्रकार प्रताप कुमावत यांनी केले.
कार्यक्रमास नाशिराबाद सरपंच विकास पाटील, एच. के. सावकारे, संदिप पाटील, निवृत्त कलाशिक्षक राजेंद्र जावळे, रेखा चौधरी (भुसावळ सेंट अलायलेस स्कूल कलाशिक्षिका ), संजय हिवरे, हितेश्वर मोतीरमाणी, प्रख्यात शिल्पकार निरंजन शेलार, चित्रकार योगेश सुतार, सुरेश पाटील, उल्हास सुतार मान्यवर कलावंत,रसिक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संतोष साळवे, स्वप्नील पाटील, संतोष शिरसाडे, विशाल जैन, शकील शेख पेंटर यांनी अनमोल सहकार्य केले .

Protected Content