Home क्राईम करगाव येथे विष घेऊन एकाची आत्महत्या!

करगाव येथे विष घेऊन एकाची आत्महत्या!

0
34


चाळीसगाव, प्रतिनिधी | तालुक्यातील करगाव येथे ६० वर्षीय व्यक्तीने विष घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

तालुक्यातील करगाव येथील महादू सुरसिंग देवरे (वय-६०) रा. करगाव ता. चाळीसगाव याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी १०:१५ वाजताच्या पूर्वी (वेळ निश्चित नाही) उघडकीला आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. वैद्यकीय अधिकारी यांच्या खबरीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सपोनि रमेश चव्हाण हे करीत आहेत.


Protected Content

Play sound