करगाव येथे दोघांना बेदम मारहाण; गुन्हा दाखल

चाळीसगाव, प्रतिनिधी | तालुक्यातील करगांव तांडा क्र. १ येथे किरकोळ कारणावरून दोघांना लोखंडी कोयत्याने जबर मारहाण झाल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी पोलिसात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

याबाबत वृत्त असे की, तालुक्यातील करगांव तांडा क्र.१ येथील नंदलाल मोहन राठोड यांच्या घरासमोर काही जण आरडाओरड करून शिवीगाळ करत असल्याने रमेश भवन राठोड हा त्याठिकाणी विचारपूस करण्यासाठी गेला. मात्र त्याचाच राग आल्याने नंदलाल राठोड यांनी शिवीगाळ करून लोखंडी कोयत्याने रमेश राठोड याच्या डोक्यात मारून जबर दुखापत केली. तेव्हाच मणिषा नंदलाल राठोड यांनी भवन शंकर राठोड (वय-६०) याचे पाय ओढून कोयत्याने डाव्या कानावर, गालावर व पंजावर मारहाण करून जबर दुखापत केली. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. यात दोघांनाही गंभीर दुखापती झाल्याने त्यांना तातडीने दवाखान्यात हलविण्यात आले. हि थरारक घटना १३ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. भवन शंकर राठोड यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात नंदलाल मोहन राठोड व मणिषा नंदलाल राठोड यांच्या विरुद्ध भादवी कलम- ३०७, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सपोनि रमेश चव्हाण हे करीत आहेत.

Protected Content