खामगाव ग्रामीण रूग्णालयात लसीकरण महाशिबीराचे आयोजन

खामगाव प्रतिनिधी । शहरात कोरोना आटोक्यात असतांना कोरोना लसीकरणावर अधिक भर देण्यात आला आहे. लसीकरण बाकी असलेल्या नागरीकांसाठी खामगाव सामान्य रूग्णालयात १७ डिसेंबर रोजी लसीकरण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

 

शहरासह जिल्ह्यात आता कोरोना आटोक्यात आला आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये सार्वजिक वाहतूक व्यवस्थेचा वापर कारतांना नागरीकांनी लसीकरण घेतल्याबाबतचे प्रमाणपत्र व ओळखपत्र ठेवण्याचे आवाहन केले आहे. त्याचप्रमाणे ज्या नागरीकांचे लसीकरण बाकी आहे त्यांच्यासाठी शुक्रवारी १७ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते रात्री ९ वाजे दरम्यान खामगाव ग्रामीण रूग्णालयात महालसीकरण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. नागरीकांनी लसीकरण करू घ्यावे असे आवाहन खामगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांनी केले आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!