करगाव येथे खावटी योजनेतून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

चाळीसगाव,प्रतिनिधी ।  चाळीसगाव तालुक्यातील करगाव येथे आदिवासी समाजाच्या कुटूंबियांना खावटी योजनेअंतर्गत मिळणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंचे आमदार मंगेश चव्हाण यांच्या हस्ते ३२ आदिवासी लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले. 

 

चाळीसगाव तालुक्यात सध्या खावटी योजनेअंतर्गत आदिवासी समाजाला मटकी, चवळी,  हरभरा, वटाणा, उडीद, डाळ, तूर डाळ, साखर,  शेंगदाणा तेल, गरम मसाला, मिरची पावडर, मीठ व चहापत्ती आदी जीवनावश्यक वस्तू ह्या वितरीत करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून तालुक्यातील करगाव येथे नुकतीच आमदार मंगेश चव्हाण यांच्या हस्ते आदिवासी समाजाच्या ३२ कुटुंबाला जीवनावश्यक वस्तूंचे वाटप शनिवार, १७ रोजी करण्यात आले.  या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना एकूण ४ हजार रुपयांचा लाभ मिळतो. त्यातील २  हजार हे प्रत्यक्षात खात्यात जमा करण्यात येते तर उर्वरित २  हजार रुपयांचे किराणा मालाची मदत केली जाते. याप्रसंगी करगाव ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच अर्चना किरणसिंग देवरे, उपसरपंच धनुबाई देविदास काळे, ग्रामसेवक पंकज चव्हाण, किरणसिंग विजयसिंग देवरे, माजी पंचायत समिती सदस्य धनंजय आप्पा मांडोळे, अमोल चव्हाण, रोहन सूर्यवंशी, रणजित पाटील, माजी चेअरमन दिनकर राठोड, प्रशांत मराठे, योगिता पुरकर, ग्रामपंचायतीचे सदस्य, कर्मचारी व लाभार्थी उपस्थित होते.

 

Protected Content