‘कथा क्षत्रिय शौर्याच्या’ पुस्तकाचे उद्या प्रकाशन

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |   येथील प्रख्यात इतिहास अभ्यासक आणि लेखक प्रा. श्रीकृष्ण विष्णू सोमवंशी यांनी लिहिलेल्या ‘कथा क्षत्रिय शौर्याच्या’ या पुस्तकाचे प्रकाशन रविवार, २४ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात होणार आहे.

 

‘कथा क्षत्रिय शौर्याच्या’ या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक बाबुराव पिंपळे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, क.ब.चौ.उ.म.वि.चे माजी कुलगुरु डॉ. के. बी. पाटील, महाराष्ट्र सोमवंशी समाजाच्या अध्यक्ष मोहनराव पिंपळे, अ.भा. अध्यक्ष प्रमोद बागलाणे तसेच रमेश भागवत आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान केलेल्या परंतु दुर्लक्षित राहिलेल्या सोमवंशी आर्य क्षत्रिय समाजातील स्वातंत्र्य सैनिकांची प्रेरणादायी गाथा या पुस्तकात मांडण्यात आली आहे.  कार्यक्रमाला उपस्थिती देण्याचे आवाहन लेखक प्रा. श्रीकृष्ण विष्णू सोमवंशी तसेच प्रा. डॉ. राधिका श्रीकृष्ण सोमवंशी यांनी केले आहे.

 

Protected Content