Home Cities जामनेर जळगाव महानगरपलिकेत शिवसेनेचा भगवा : पहूर येथे फटाक्यांची आतिषबाजी

जळगाव महानगरपलिकेत शिवसेनेचा भगवा : पहूर येथे फटाक्यांची आतिषबाजी

0
108


पहूर, ता. जामनेर प्रतिनिधी ।  जळगाव महानगरपलिका येथे शिवसेनेचा भगवा फडकला असून महापौर व उपमहापौरपदी शिवसेनेचे उमेदवार निवडून आल्याने पहूर येथे शिवसेना शहर शाखा व महाविकास आघाडी यांच्यातर्फे फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष साजरा करण्यात आला.

यावेळी माजी जि. प. कृषी सभापती प्रदीप लोढा, शिवसेना तालुका प्रवक्ता गणेश पांढरे, युवासेना उपजिल्हाप्रमुख विश्वजीत पाटील,अँड. भरत पवार,  अतुल सोनवणे, सुकलाल बारी, अमिन शेख अजमुद्दिन, शिवसेना शहर प्रमुख संजय तायडे, उपशहर प्रमुख सुभाष पाटील, शिवसेना उपतालुका प्रमुख अशोक जाधव, आरोग्य दूत प्रफुल  लोढा, वसीम शेख, सलीम शहा, यांच्यासह महा विकास आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

 


Protected Content

Play sound