कंपनीच्या आवारातून सामानांची चोरी करणाऱ्या चोरट्याला अटक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  शहरातील एमआयडीसीतील प्रांजल इंडस्ट्रीज प्लास्टिक दाणा प्लांट या कंपनीच्या मोकळ्या आवारातून ३६ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला होता. याप्रकरणी दाखल गुन्ह्यात एमआयडीसी पोलिसांनी मंगळवारी एका संशयिताला अटक केली आहे. ब्रिजेश सतीराम प्रजापती रा. रायपूर ता.जळगाव असे अटकेतील संशयिताचे नाव आहे.

 

जळगाव शहरातील एमआयडीसीतील सेक्टर एस ११५ याठिकाणी असलेल्या प्रांजल इंडस्ट्रिज या कंपनीतून चोरट्याने कंपनीची वॉशिंग मशीनची १५ एच पी मोटार, प्लास्टिक दाना कटर, छोटे कटर मोटार असा एकूण ३६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरुन नेला होता. याप्रकरणी कंपनीचे प्रमोद बाळूभाऊ मराठे रा. अयोध्यानगर यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही चोरी जळगाव तालुक्यातील रायपूर येथील ब्रिजेश प्रजापती याने केल्याची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक जयपाल हिरे यांना मिळाली होती त्यानुसार पोलीस हेडकॉन्स्टेबल अल्ताफ पठाण, राजेंद्र कांडेलकर, पोलीस नाईक सचिन पाटील, पोलीस कॉन्स्टेबल राहूल रगडे, विशाल कोळी, रविंद्र पाटील, किशोर पाटील यांच्या पथकाने संशयित ब्रिजेश प्रजापती यास अटक केली.  त्याच्याकडून गुन्ह्यातील संपूर्ण ३६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

Protected Content