Home आरोग्य औरंगाबाद जिल्ह्यात आज पाच कोरना बाधित रुग्णांचा मृत्यू

औरंगाबाद जिल्ह्यात आज पाच कोरना बाधित रुग्णांचा मृत्यू

0
76


औरंगाबाद (वृत्तसंस्था) औरंगाबाद शहरातील चार आणि सिल्लोड येथील एका कोरोनाबाधिताचा अशा एकूण पाच कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यामुळे जिल्ह्यात चिंतेचे वातावरण पसरले आहे. या मृत रुग्णांमध्ये एक पुरुष आणि चार महिला रुग्णांचा समावेश आहे.

 

जिल्ह्यात आज 16 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. यासोबत जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1301 झाली. तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात 11 कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार झाल्याने ते आज कोरोना मुक्त होऊन घरी परतले आहेत. कटकट गेट येथील 55 वर्षीय महिला रुग्णाचा 24 मे रोजी रात्री 9.30 वाजता झाला आहे. तर, गारखेडा येथील 48 वर्षीय पुरूष रुग्णाचा 24 मे रोजी रात्री 9.35 वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच, आज 25 मे रोजी मध्यरात्री एक वाजता रोहिदास नगर, मुकुंदवाडी येथील 35 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर कैलास नगरातील 75 वर्षीय महिलेचा पहाटे 3.15वाजता मृत्यू झाला आहे. तर सिल्लोड येथील अब्दलशहा नगर येथील 55 वर्षीय महिला रुग्णाचा सकाळी 6.30 वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. एकूण 55 पैकी घाटीत आतापर्यंत 50 कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे.


Protected Content

Play sound