जळगाव प्रतिनिधी । ओएलक्सवरून दुचाकी घेण्याचे आमिष दाखवत पेटीएमच्या माध्यमातून अनोळखी व्यक्तीने शनीपेठ हद्दीतील हरीओम नगरातील तरूणाला ५८ हजार रूपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. शनीपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, योगेश विठ्ठल तायडे (वय-२२) रा. हरीओम नगर, शनीपेठ हा तरूण आपल्या आईवडील व भाऊसोबत राहतो. शहरातील सुरज मेडीकलवर काम करून आपल्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतो. मेडीकलवर काम करत असल्यामुळे त्याला दुचाकीची आवश्यकता होती. त्यामुळे त्याने ओएलक्सवरून एक दुचाकी शोधण्याचे काम सुरू होते. ११ जानेवारी रोजी ओएलक्सवर एक दुचाकी आवडली व दिलेल्या मोबाईलवर संपर्क साधला. दुचाकीचे कागदपत्र मागावले, व्हॉटसॲपवर कागदपत्रे पाठविले, अनोळखी व्यक्तीने पाठविलेले कागदपत्रे पाहून योगशचा विश्वास बसला, दुचाकीची रक्कम २२ हजार रूपयांचा डन झाली. व तत्काळी २ हजार १५० रूपये पेटीएमने पाठविले. त्यानंतर समोरील व्यक्तीने मी इंडीयन आर्मी पोस्ट ऑफिस मधून बोलत असल्याची बतावणी करून पैसे पाठविल्याशिवाय गाडी मिळणार नाही. असे सांगितल्यावर ५ हजार रूपये दोन वेळा, ९ हजार १५० दुसऱ्यांदा, ९ हजार १०० तिसऱ्यांदा पाठविले, तरी देखील गाडी मिळाली नाही. पुन्हा त्याच व्यक्तीचा फोन आला आणि ११ हजार ९९९ रूपये ऑनलाईन तत्काळ पाठवा, गाडी तुम्हाला ताब्यात मिळून जाईल असे सांगितल्यावर आपली फसवणूक होत असल्याचे योगेशला समजले. त्याने तातडीन शनीपेठ पोलीस ठाण्यात धाव घेतली. योगेश तायडेच्या फिर्यादीवरून ५८ हजार ३७३ रूपयांची फसवणूक झाल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास प्रभारी पोलीस निरीक्षक धनंजय येरूळे करीत आहे.