जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या केंद्रीय प्रशिक्षण व नियुक्ती कक्षाअंतर्गत केमिकल टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित ऑनलाईन मुलाखतीमध्ये तीन विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.
युनिर्व्हसिटी इन्स्टिटयूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी येथील विद्यार्थ्यासाठी शापूर्जी पलोनजी अॅडव्हॉन्स इंजिनियरींग मटेरियल्स या नामांकित कंपनीतर्फे मुलाखती आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यामधून बी.टेक. प्लॅास्टीक आणि एम. टेक केमिकल इंजिनियरींचे नील गोडबोले, आशुतोष क्षत्रिय (एम.टेक केमिकल इंजि.) आणि शुभम चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कुलगुरु प्रा.व्ही.एल.माहेश्वरी, प्र.कुलगुरु प्रा. एस. टी. इंगळे, प्रभारी कुलसचिव प्रा. किशोर पवार, संचालक प्रा. जे. बी. नाईक, प्लॉस्टीक विभागाचे प्रमुख डॉ. जे. एस. नारखेडे, समन्वयक प्रा. रमेश सरदार, उपसमन्वयक डॉ. उज्वल पाटील यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.