रावेर प्रतिनिधी । धनगर समाजाला एसटी प्रवर्गाचा दाखला मिळावा यामागणीसाठी धनगर समाज संघर्ष समिती तर्फे रावेर तहसीलदार कार्यालयासमोर ढोल बजाव आंदोलन करण्यात आले.
धनगर समाज संघर्ष समितीचे उत्तर महाराष्ट्र प्रमुखसुरेश धनके, जिल्हा अध्यक्ष संदीप सावळे, तालुकाध्यक्ष राजन लासुरकर यांच्या नेतृत्वाखाली धनगर समाजाला एस. टी प्रवर्गाचा दाखला द्या, इतर विविध मागण्यासाठी ढोल बजाओ सरकार जगाओ आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनाकातर्फे नायब तहसीलदार सी.जी.पवार यांना निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी धनगर संघर्ष समितीचे जिल्हाउपाध्यक्ष लखन सावळे, अँड. प्रविण पाचपोहे, अँड. भास्कर निळे , गणेश बोरसे, प्रविण अजलसोंडे, वासुदेव सावळे रमेश वैदकर, मोहन बोरसे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.